Mahanews
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
फर्स्ट पर्सन
वर्षा पर्यटनासाठी साद घालतोय गगनबावडा .. .
तर मग आपणही ही मजा चाखण्यासाठी गगनबावडय़ाला या... तो आपणाला साद घालत आहे.
दिलखुलास
जय महाराष्ट्र
अनधिकृत शिक्षणसंस्था चालकांना दंड आणि शिक्षा -राजेश टोपे
अनधिकृत शिक्षणसंस्थेद्वारे होणारी विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनधिकृत संस्था प्रतिबंध कायदा तयार केला असून हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.
लोकराज्य



(खरंच) मुलगी झाली हो S S S !
सोमवार, ८ मार्च, २०१०

स्त्री-पुरुष प्रमाणाचा वाढता असमतोल ही आज गहन समस्या बनली आहे. सोनोग्राफीसारख्या आधुनिक तंत्राच्या गैरवापरामुळे ही समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. मुलींचे दरहजारी मुलांमागे प्रमाण वाढण्याची गरज आहे आणि हे प्रमाण नैसर्गिक पातळीवर आणून ठेवायचे असेल तर कायद्याच्या कडक अंमलबजावणीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्भलिंग निदान रोखण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.

पुरोगामी विचारांचा आणि प्रगतीशील म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यात तर मुलामुलींचे प्रमाण अत्यंत चिंताजनक पातळीवर आले आहे. यावर मात करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन गर्भलिंग निदान करणार्‍या केंद्रांवर लगाम लावला आहे. याची फलनिष्पत्ती म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ लागली आहे.

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने स्त्रीभृणहत्त्या रोखण्यासाठी तयार केलेल्या www.savethebabygirl.com या वेबसाईटला नॅसकॉम फौंडेशनचा उत्कृष्ट वेबसाईट पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक प्रश्नांवर अंकुश ठेवणारी ही वेबसाईट देशपातळीवर उल्लेखनीय ठरली आहे.

जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रे ऑनलाईन जोडणार्‍या या अनोख्या वेबसाईटविषयी अधिक जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा मार्च १० चा महिला दिन विशेषांक

केवळ ५० रुपयांत लोकराज्यचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी पुढील पत्त्यावर संपर्क साधा -
सहायक संचालक (माहिती), वितरण विभाग,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन,
बरॅक नं. १९, फ्री प्रेस जर्नल मार्ग, मुंबई- ४०० ०२१
दूरध्वनी क्र. (०२२) २२०२१५३०, २२०२३९५७,



'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
ई बातमी
Copyright DGIPR and Government of Maharashtra About Us  |  Team  |  Contact us  |  Feedback  |  Terms of use |  Hacking Notification
Site is best viewed with IE 6.0 or higher and min. screen resolution of 1024x768 Developed by OneUpDesigns
A Yass Multimedia Project
Total visits : 3219926